न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

   अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 4, सावंतवाडी येथे कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण तसेच वृक्ष लागवडीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, वेंकटेश शेट यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे