अ.भा. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी आनंद धोंड
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी संपादक आनंद धोंड यांची निवड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात केली.
यावेळी राजा माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी प्रा. रुपेश पाटील, कोकण विभाग संघटक राजेश नाईक, जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली.


