न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

उबाठा शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्ताने पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे माजी आमदार उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व मुलांसमवेत केक कापून साजरा करण्यात येणार. तसेच माजी आमदार उपरकर चषक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन, त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. तर आरोग्य केंद्रांमध्ये फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख (तथा) सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार व युवा पदाधिकारी आबा चिपकर यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे