न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली

 

मनोज मुसळे हे कणकवली शहरात वास्तव्यास होते. त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ तसेच सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून विविध ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते.दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यातून ते सध्या उपचार घेत आहेत. त्यानंतर आता प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने महसूल विभागासह सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे