कशेडी घाटात मातीचा ओसारा; महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
रायगड/ वृत्तसंस्था
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे चोळई परिसरात मातीचा ओसारा आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहतूक नियंत्रित पद्धतीने सुरू असून, वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


