न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सीजेपीसाठी रत्नागिरीतील एकवटले हजारो युवक

रत्नागिरी / प्रतिनिधी 

जंतरमंतर येथे झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे हजारो युवक एकवटले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस बळाच्या वापराचा व दडपशाहीचा तीव्र निषेध करत आज मारुती मंदिर येथून अतिविराट मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात रत्नागिरीतील तरुण, तरुणी आणि पालकवर्ग सहभागी झाला होता. चार ते साडेचार हजार आंदोलकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मारुती मंदिर येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय सरकार आणि नीट पेपरफुटी प्रकरणी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे