न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालघर जिल्ह्यात पुर…

पालघर/ वृत्तसंस्था

पालघरमध्ये सलग मुसळधार पावसामुळे डहाणू, तलासरी, आणि पालघर तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। डहाणूमध्ये वेती गावातील पूल वाहून गेल्याने २०० हून अधिक नागरिक अडकले आहेत। प्रशासनाने सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून NDRF ची अतिरिक्त मदत मागवण्यात आली आहे।पूरस्थिती आणि मदतकार्याबद्दलच्या काही प्रमुख अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत:

सूर्या नदीला पूर आल्याने  कवडास धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे सूर्या नदीच्या पात्रात पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे। डहाणू व तलासरी परिसरातील अनेक घरे व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे।बचावकार्य सुर आहे .

केळवे येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गर्भवती महिलेला स्थानिकांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने छातीएवढ्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले।. हवामान विभागाने पालघरसाठी ‘रेड अलर्ट’ दिला असून पुढील २४ ते ४८ तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे