सावंतवाडी श्री विठ्ठल मंदिर आषाढी महाएकादशी निमित्त विविध कार्यक्रम
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर आषाढी महाएकादशी निमित्त शनिवार दिनांक २५ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता : काकड आरती व महापूजा (पूजेचे मानकरी, शेखर गुरुनाथ धारगळकर व सौ. शर्वरी शेखर धारगळकर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे)
सकाळी ११.३० ते २.०० : श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम. दुपारी २ ते ३ : श्री कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम. दुपारी ३ ते ४ : महिला मंडळ सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम. सायंकाळी ४ ते ६ : पंडित योगेश बोरचाटे माणगाव यांचा सुश्राव्य संगीत गायनाचा कार्यक्रम. सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन. रात्रौ ९ नंतरः श्रींची पालखी सेवा.
रविवार दिनांक २६ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन. रात्रौ ९ नंतरः श्रींची पालखी सेवा.
सोमवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन. रात्रौ ९ नंतर : श्रींची पालखी सेवा.
मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. सौ. सिद्धी मेस्त्री(ओटवणे) यांचे कीर्तन. रात्री ९ नंतर : श्रींची पालखी सेवा. बुधवार दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.


