कोंकणासह पुण्यात मान्सूनपुर्व पावसाचे धुमशान
मुंबई/ प्रतिनिधी
पहाटे पासूनच दक्षिण कोकणासह मुंबई , पुण्यासह ठाणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा खारेगाव. घोडबंदर रोड आणि मुंब्रा सारख्या शहरांमध्ये पहाटे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे…. गेले अनेक दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हा पासून नागरिक त्रस्त झाले होते आता मान्सूनपूर्व पावसामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे..
दक्षिण कोकणात मध्यरात्री विजांच्या लखलाटासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी विज चार ते पाच तास गायब होती.


