महिला आयपीएल… बेंगळुरू पुन्हा विजेता
बडोदा/
महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना आज रंगला. हा फायनल सामन्याचा थरार वडोदरातील कोटंबी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात मध्ये रंगला. या फायनल सामन्याचे नाणेफेक आरसीबीने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 203 धावा केल्या. याउलट आरसीबीने हा सामना सहा विकेट्सने जिंकला आणि दुसरी ट्रॉफी आपल्या नावावर केली.
अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 204 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात, त्यांची कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉलने आरसीबीला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 165 धावांची विक्रमी भागीदारी दिसून आली, ज्यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. स्मृती मानधना 87 धावा तर जॉर्जिया वॉलने 79 धावा केल्या. आरसीबीने हे लक्ष्य 19.4 चेंडूत पूर्ण केले.


