न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भोसले इन्स्टिट्यूटची ‘गो-कार्ट’ ठरली ‘जजेस चॉईस

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गो-कार्टला कोइमतूर येथील ‘गो-कार्ट डिझाईन चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘जजेस चॉईस’ पुरस्कार मिळाला असून देशात तेरावा क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला आहे.

इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स यांच्या वतीने कोइमतूर येथे आयोजित या गो कार्ट स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या एकूण अठ्ठेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी टेक्निकल इन्स्पेक्शन, ब्रेकिंग टेस्ट, एक्सलरेशन टेस्ट, स्किडपॅड, ऑटोक्रॉस आणि एंड्युरन्स अशा विविध चाचण्या घेतल्या गेल्या. विशेष म्हणजे स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असतानाही भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाने सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आणि ‘जजेस चॉईस’ हा विशेष पुरस्कार पटकावला.

हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी संघाचा कॅप्टन गौरांग तुळसुलकर याच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कॉलेजचे माजी विद्यार्थी कपिल मळगावकर व मनीष मणेरीकर यांचेही सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांना कॉलेजचे अधिव्याख्याता मिलिंद देसाई, मनीष घाटगे व आशिष सुवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रोजेक्टसाठी भोसले नॉलेज सिटी व्यवस्थापन, थर्मल इन्स्ट्रुमेंट्स, हिंदुस्तान पॉलिमर, सॉफ्ट मस्क प्रा.लि, मॅपसन्स यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे