न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोमसापचे पुरस्कार प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना जाहीर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. विधीज्ञ दीपक नेवगी स्मृती पुरस्कार आज जाहीर जाहीर करण्यात आले. स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना तर स्वर्गीय विधीज्ञ दीपक नेवगी स्मृती पुरस्कार माळगाव येथील सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी तथा प्रसिद्ध कीर्तनकार शेखर पाडगावकर यांना जाहीर करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्या वतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. विधीज्ञ दीपक नेवगी यांना आज शनिवारी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावंतवाडी येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणा कोमसापचे शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केली. यावेळी कोमसापचे सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, सदस्य दिनानाथ नाईक यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या ‘चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात’ होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘कोमसाप’ सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे