न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी येथे २८ एप्रिलला श्री टेंबे स्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. १२ शके १९४८, मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी ८.०० वा.श्री एकमुखी दत्त पूजा, लघुरुद्र, अभिषेक, ९.०० वा. श्री सत्यदत्त पूजा, दु.१२.३० श्रींची महाआरती, दु. १.३० वा.महाप्रसाद, सायं.४.०० वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ७.३० श्रींची आरती, ८.०० वा. श्रींचा पालखी सोहळा, ९.०० वा. स्थानिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे