न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रूग्णालयात नेलं… तर आंदोलकांनाही हटविले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीच्या जंतर मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. शिक्षण शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांच्या निदर्शने आणि घोषणाबाजी दरम्यान, शनिवारी पहाटे पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच जंतरमंतर वरील आंदोलकांना फरफटत बाजूला केले.

सोनम वांगचूक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरातून सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. नीट पेपर फुटीवरून सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, राजकीय पातळीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती.

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, कोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीच्या हायकोर्टात सोनम वांगचूक यांच्या तब्येतीवरून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं होतं की, सरकारी डॉक्टरांनी सोनम वांगचूक यांची नियमितपणे तपासणी करावी. तसेच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, आवश्यक ती पावले उचलावीत, असे कोर्टाने नमूद केले होते. दुसरीकडे प्रकृती खालावत असतानाही शुक्रवारी रात्री त्यांनी व्हिडिओ शेअर करत 20 जुलैच्या आंदोलनासाठी आवाहन केलं होतं. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे