शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिराचे १४ विद्यार्थी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
इयत्ता पाचवी शिष्यवृती परीक्षेत पीएम श्री कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर सावंतवाडी नंबर 2 या शाळेने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या इतिहासात एकाच शैक्षणिक वर्षात 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविणारी हि जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. न भूतो न भविष्यती अशी हि कामगिरी आहे.
शाळेचा विद्यार्थी कुमार आराध्य अमोल आपटे हा शहरी शिष्यवृत्तीधारक मध्ये राज्यात नववा तर जिल्ह्यात पहिला आला.
कुमार पूर्वांग कुणाल माळगावकर जिल्ह्यात पाचवा, सई शिवाजी आरेकर जिल्ह्यात 7 वी सुरेश मंगेश वरक जिल्ह्यात 8 वा शिष्यवृत्तीधारक आहे.
नील पांडुरंग थोरात जिल्ह्यात 14वा, श्रीशा मिहिर प्रभुदेसाई जिल्ह्यात 16 वी, स्वामिनी अजित कोळी जिल्ह्यात 19 वी, साहिल शाहू खरात जिल्ह्यात 20 वा, दुर्वा अजित सावंत जिल्ह्यात 25 वी, श्रीकर मंदार शुक्ल जिल्ह्यात 27वा. शिष्यवृत्ती धारक आहे.
कुमार मैत्रेय राजाराम दळवी, शहरी कुमारी मीरा मकरंद देसाई, कुमार नील प्रशांत नार्वेकर, कुमारी सानवी चेतन देसाई शहरी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत.
सर्व मुलांचे,त्यांच्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षक श्री. रणजीत सावंत, श्रीम. पूजा ठाकूर, श्रीम. प्राची ढवळ, श्री. भावना गावडे, श्रीम. हेमांगी जाधव, श्री. तेजस बांदिवडेकर, या सर्वांचे तसेच आमचे मार्गदर्शक, केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


