नागपुरात हॉटेलवर गुन्हे शाखेची रात्री धाड! 36 पुरुष आणि 9 महिलांना घेतलं ताब्यात
नागपूर / वृत्तसंस्था
नागपुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने धाड टाकून एकूण 45 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 36 पुरुष आणि 9 महिला आहेत. रात्री धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


