रायगडच्या पोलीस अधीक्षकांचा सायकलवरून कार्यालय प्रवास
रायगड/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी शासकीय वाहनाऐवजी सायकलने कार्यालयात जाण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या साध्या पण प्रभावी उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून पोलीस दलातही सकारात्मक संदेश गेला आहे.


