साता-यात बोट बुडून नाविक बेपत्ता…दोघे वाचले
सातारा/
महाबळेश्वर तालुक्यातील बामणोली परिसरात वादळी वाऱ्यामुळे पर्यटकांची बोट कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडाली. मुंबईहून आलेल्या दोन पर्यटकांनी पोहत किनारा गाठून जीव वाचवला, मात्र बोट चालक रुपेश तांबे बेपत्ता झाला असून शोधमोहीम सुरू आहे. ही दुर्घटना सावरी गावाजवळ घडली.


