न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जहाजावर ड्रोन हल्ला… भारताचे दुसरे जहाज बुडाले… कर्मचारी सुरक्षित

अहमदाबाद/

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. ‘हाजी अली’ नावाच्या जहाजावर ओमानच्या सागरी किनाऱ्यावर ड्रोन हल्ला झाला. हल्ल्याची तीव्रता अतिशय जास्त होती. हल्ल्यानंतर हाजी अली जहाजाला जलसमाधी मिळाली. हाजी अली मालवाहू जहाज होतं. इराण युद्धादरम्यान भारतीय जहाजांवर ड्रोन हल्ले झाल्याच्या मोजक्या घटना घडल्या आहेत. हाजी अलीवर नेमका कोणी हल्ला केला, याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

हाजी अली जहाजावर १४ जण होते. ओमानच्या नौदलानं त्या १४ जणांना वाचवलं आहे. मालवाहू जहाज ‘हाजी अली’ (MSV HAJI ALI BDI १४९२) गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील आहे. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत भारती जहाज बुडाल्याची ही दुसरी घटना आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात सुरु असलेल्या तणावाचा सर्वाधिक फटका गुजरातमधील जहाज उद्योगाला बसताना दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी गुजरातमधील ‘अल फैज नूर सुलेमानी- १’ जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुडालं. अमेरिका आणि इराणच्या सैन्यात तुफान गोळीबार झाला. या धुमश्चक्री दरम्यान ‘अल फैज नूर सुलेमानी- १’ जहाजानं जलसमाधी घेतली.

१३ मे रोजी भारतीय जहाज सोमालियाच्या बरबराहून शारजाहच्या दिशेनं जात होतं. जहाज ओमानच्या लिमाह जवळून जात असताना एक ड्रोन जहाजावर धडकलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. यामुळे जहाजावर आग लागली. आग लागल्यावर जहाज समुद्रात बुडू लागलं. ही बाब लक्षात येताच जहाजावरील १४ जणांनी टाईम सिग्नलचा वापर करुन लाईफ जॅकेट्सची मदत घेत स्वत:चा जीव वाचवला. ओमान तटरक्षक दलानं तात्काळ हालचाली केल्या. त्यामुळे सर्व भारतीय खलाशी वाचले. अपघातानंतर त्यांना ओमानच्या दिबा बंदरात पोहोचवण्यात आलं. जहाजावरील १४ जणांना सुरक्षित वाचवण्यात आल्याच्या माहितीला ‘हाजी अली’चे मालक सुलतान अहमद संघार यांनी दुजोरा दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे