न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुणकेरीतील झोरे भाऊ बहीण पुण्यात चमकले

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी शाळा नं. २ च्या इयत्ता दुसरीतील कु आर्यन बाबू झोरे आणि इयत्ता चौथीतील कु आराध्या बाबू झोरे या दोन भावंडांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अनुक्रमे ९ वा आणि २१ वा क्रमांक पटकाविला. कु आर्यन झोरे याने या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ९ वा क्रमांक मिळवताना या स्पर्धेत पहिल्या १५ विद्यार्थ्यांच्या विशेष राष्ट्रीय यादीत स्थान पटकावले.
इयत्ता चौथीतील कु आराध्या झोरे हिने यशवंत स्पर्धा परीक्षेत १८० गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावताना गोल्ड मेडल पटकावत अव्वल स्थान प्राप्त केले. तसेच आराध्या झोरे हिने सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत १६८ गुणांसह गोड मेडल व ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ७९ गुणांसह ब्राँझ मेडल पटकाविले.
इयत्ता दुसरीतील कु आर्यन बाबू झोरे याने सिंधू रत्न टॅलेंट परीक्षेत १७३ गुणांसह गोल्ड मेडल व ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ८९ गुणांसह ब्राँझ मेडल प्राप्त केले. इयत्ता तिसरीतील कु सौम्या रामदास झोरे हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ५१ गुणांसहउल्लेखनीय यश प्राप्त केले. तसेच मंथन जनरल नॉलेज परीक्षेत आर्यन झोरे याने १५० पैकी १३० गुण घेत राज्यात अकरावा तर जिल्ह्यात सहावा क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, माजी सभापती प्रमोद सावंत, केंद्रप्रमुख भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे, भगवान सावंत, एकनाथ सावंत, नाना गावडे, कैलास परब, रघुनाथ गावडे, तानाजी सावंत, कृष्णा गावडे, महादेव गावडे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे