कोकण लाईव्ह न्युज चॅनलच्या जीवन गौरव पुरस्काराने पत्रकार राजू तावडे सन्मानित
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कोकण लाईव्ह न्युज चॅनलचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पत्रकारितेतील जीवन गौरव पुरस्कार आज शनिवारी माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण भोसले यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक सरहद्दचे कार्यकारी संपादक राजू तावडे यांना प्रदान करण्यात आला. श्री. भोसले यांच्या हस्ते श्री. तावडे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उबाठा शिवसेना प्रवक्त्ये व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, शिवसेनेचे पदाधिकारी अशोक दळवी, कोकण लाईव्ह न्युज चॅनलचे मुख्य संपादक श्री. सिताराम गावडे व मान्यवर उपस्थित होते.


