महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून नागरिकांना कडक सूचना, कोणत्या गोष्टी टाळाव्या लागणार?
मुंबई/
येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान; तसेच मध्य भारतातील तुरळक भागांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. किनारपट्टी आणि पूर्वेकडील भागात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीही उकाडा जाणवू शकतो. ‘२७ एप्रिलपर्यंत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल; तर मध्य आणि इतर भागांत अंदाजाच्या कालावधीत तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ आणि त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे,’ असेही यांनी सांगितले


