न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेय उच्च न्यायालयातील जनहित याचिकेला: डॉ. परुळेकर 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेबाबतचा तिढा न्यायालयात सुटल्यानंतर जणू काय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले व शस्त्रक्रियाही पार पडली असा जल्लोष शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा जो प्रकार सुरू आहे तो योग्य नसून अभिनव फौंडेशन संस्थेने उच्च न्यायालयात याबाबत जी जनहित याचिका दाखल केली, त्यामुळे हा प्रश्न सुटला आहे. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

आपण ९० गुंठे विनामूल्य जमिन दीली असे सांगणाऱ्यांनी विनामूल्य काही सोडले नाही. या केसमधून ५० गुंठे जमीन मिळवली. आपण मोठा त्याग केला असा अविर्भाव आणून ते जनतेच्या मनात कुठेतरी आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप डॉक्टर परुळेकर यांनी केला. आज पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज असते तर त्यांनी सर्व जमीन आरोग्य सुविधांसाठी सढळहस्ते दान दिली असती. त्यांच्याजवळ देण्याची वृत्ती होती. म्हणूनच प्रत्येक जनतेच्या हृदयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे स्थान आहे. असे परुळेकर म्हणाले.

डाॅ.जयेंद्र परुळेकर म्हणाले, मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणून आपण ८० कोटी रुपयांची इमारत उभी करणार आहात. पण त्यात किती डॉक्टर येतील, रुग्णांना काय सुविधा मिळतील हे कोण सांगू शकत नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणाऱ्या डॉक्टरांची कमतरता तुम्ही पूर्ण करू शकत नाही. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेली कित्येक वर्ष डॉक्टरांच्या १९ जागांपैकी फक्त दोन जागा भरल्या आहेत. तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लागणारे एमडी व एमसीए पदवीधर डॉक्टर आपण या ग्रामीण भागात काय आणू शकणार ? असा सवाल यांनी केला. सध्या राज्यात इमारतींवर कोट्यावधी रुपये खर्च करून त्याबदल्यात ठेकेदाराकडून ४० टक्के पर्यत कमिशन लाटण्याची स्पर्धा सुरू आहे. असाच प्रकार मल्टीपेशालिटीच्या नावाखाली होऊ नये, असा टोला डाॅ.परुळेकर यांनी हणला.

मल्टी स्पेशलिटी रुग्णालयाची जागा ही सरकारच्या ताब्यात होती. त्याच्यावर न्यायालयात केस चालू होती. पण आता तडजोड करून यातील काही जागा सावंतवाडीच्या राज घराण्याला देण्यात आली. गेली अनेक वर्षे यात काय तडजोड होत नव्हती का? याच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कथा सांगत मतदारांची दिशाभूल करून २०१४ पासून आमदार दीपक केसरकर यांनी आजपर्यंत आमदारकीच्या निवडणुका जिंकल्या. असा आरोपही डॉक्टर परुळेकर यांनी केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे