राजा शिवाजी चौक येथे छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार…. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) सावंतवाडी येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले. याविषयी लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हा प्रस्ताव देणार असल्याचे साळगावकर म्हणाले.
राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री. बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक (गवळी तीठा) येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य – दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. सर्व शिवप्रेमींना एकत्र करून कमिटी स्थापन केली जाईल. ही शुभ वार्ता ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा गडगडात केला.
मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, रवी जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार बंड्या तोरस्कर,सचिव दीपक सावंत , महादेव राऊळ यांनी हा प्रस्ताव एकमताने साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता. या पवित्र विषयाला दिशा देण्याचे काम बबन साळगावकर यांनी केले आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी यासाठी सर्वांनी कामाला लागून, या कार्याला पूर्ण सहकार्य करुया असे आवाहन केले. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनीही मदत करू असे आश्वासन दिले.या प्रसंगी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, रोटरी क्लब अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ,नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, संजय पेडणेकर, प्रदीप भालेकर, दिलीप भालेकर, यशवंत देसाई, विजय सावंत, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दिलीप पवार, सहसचिव महादेव राऊळ, प्रसिद्धी प्रमुख रवी जाधव, मनोज घाटकर, सत्यम सावंत, मनोज राऊळ, वासुदेव खानोलकर, संजय साळगावकर, सुंदर गावडे, शुभम मळकाचे उपस्थित होते.


