परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कोट्यावधीचा घोटाळा
परभणी | वृत्तसंस्था
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 2019 पासून च्या लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेत मनसेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या असल्याचे आरोप करण्यात आले आहे. चक्क लेखापरीक्षण अहवालच समोर आल्यामुळे ही अनागोंदी खरी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मनसे कडून आज पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती देण्यात आली. एक मे पर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेले गैरव्यवहार सुरळीत केले नाही तर दोन मे रोजी विद्यापीठाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे


