न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चार वाहनांच्या विचित्र अपघातात सहा विद्यार्थ्यासह सात जणांचा मृत्यू

बंगळुरू/ विनुथा के आर 

कर्नाटकात दोन कार, बाईक अन् कॅन्टरच्या भयानक  अपघातामुळे रस्त्यावर मृत्यूचं तांडव झाले. या भीषण अपघातात बारावीच्या ६ सहा मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू झालाय. बंगळुरूमधील होसकोटेमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ शुक्रवारी हा भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने पाठीमागून दुचाकीला जोरात धडकली. अनियंत्रित झालेली कार कॅन्टरला जोरात धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकी चालकासह ६ बारावीच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारे ६ विद्यार्थी कारने लाँग ड्राईव्हसाठी रात्री घराबाहेर पडले होते. अभ्यासाच्या तणावातून बाहेर निघण्यासाठी सर्वजण फिरायला बाहेर पडले होते. पण होस्कोट राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने मागून दुचाकीला जोरात धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने ती कॅन्टरलाही जाऊन धडकली. या भीषण अपघातात बारावीच्या सहा मुलांचा आणि दुचाकी चालक गगन याचा मृत्यू झाला. अश्विन नायर,अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान यांचा मृतांमध्ये समावेश आहे.”
महामार्गावर झालेला हा अपघात इतका भयंकर होता की कारमधील सर्व एअरबॅग अघडल्या गेल्या. पण अतिवेग असल्याने कारमधील मुलांचा जीव वाचू शकला नाही. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर डिव्हाडर ओलांडून समोरून येणाऱ्या कॅन्टरला धडक दिली. या अपघातात काम आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीचालक गगन याचा मृत्यू झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे