न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय व ऑन कॉल रक्तदाते संस्था तर्फे १३ ऑगस्टला रक्तदान शिबिर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

लेफ्ट.कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांचे जनशताब्दी वर्ष तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दु. १.०० वाजेपर्यंत श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर एस. पी. के. कॉलेज, सावंतवाडीच्या जिमखाना हॉलमध्ये संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी इच्छुक रक्तदात्यांनी डॉ. सचिन देशमुख, [एनसीसी आर्मी प्रमुख] (7875582850), डॉ. सुधीर बुवा [राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख] (9422810226), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते सदस्य मंगेश माणगावकर (7498621235), कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे (9420740444), सचिव बाबली गवंडे (8390905269) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (9422967249) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्री. दयानंद गवस यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे