आंगणेवाडीची यात्रा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग/
मालवण तालुक्यातील आंगणे वाडीतील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दोन दिवसांत राज्यभरातून भाविक आले होते. पोलीसांच्या योग्य नियोजनामुळे यात्रेत कोणतेही गालबोट लागले नाही. राजकीय मांदियाळीची वाणवा निवडणूकांमुळे दिसली… यात्रेत अर्ध्याहून अधिक मुंबई,ठाणे भागातील भाविक होते.


