सावंतवाडीत उद्या सभापती निवड… मतदारांनी जास्त मतं दिलेल्यांनाच सभापती करण्याची नागरिकांची मागणी
सिंधुदुर्ग/
सावंतवाडी नगरपालिकेत विषय समित्यांच्या सभापतींसाठी उद्या नावे जाहीर करण्यात येणार आहेत. यावेळी जुन्या चेहऱ्यांना पहिले स्थान दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांंच्या मते ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांचा कौल मतदारांना दिली आहेत. त्यांना सभापती करण्यात यावे. तसे न केल्यास तो मतदारांचा अपमान ठरू शकतो… खरी लोकशाही म्हणत असल्यास ज्या नगरसेवकांना लोकांनी जास्त मतं दिली त्याच प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे.


