सिंधुदुर्गातील वीज समस्या दुर करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा अधिका-यांना आदेश
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या समस्येसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
तालुकानिहाय तसेच काही गावांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याची माहिती घेऊन नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेतली. दरम्यान, वीज ब्रेकडाऊनची कारणे समजून घेऊन त्यावर योग्य नियोजन करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यापूर्वी वृत्तपत्रे व इतर माध्यमांद्वारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवावा आणि तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्यावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.


