न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चौथे भारतीय जहाज ‘फुजैराह’मधून सुखरुप रवाना तर ८०८० टन कच्चं तेल घेऊन भारतीय ध्वजांकित ‘जग लाडकी’ मायदेशी येणार

मुंबई/

संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराह तेल केंद्रावर भारतीय ध्वजांकित ‘जग लाडकी’ हे जहाज तेल भरत असताना या केंद्रावर शनिवारी हल्ला झाला होता. मात्र, सुमारे ८०,८०० टन कच्चे तेल घेऊन ‘जग लाडकी’ हे जहाज रविवारी सकाळी १०.३० वाजता फुजैराहमधून सुखरूप भारताच्या दिशेने निघाले,’ अशी माहिती केंद्र सरकारने दिली. पश्चिम आशियातील युद्धग्रस्त भागातून सुखरूप येणारे हे चौथे भारतीय ध्वजांकित जहाज आहे.

शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या दोन भारतीय जहाजांनी सुमारे ९२,७१२ टन एलपीजी घेऊन शनिवारी युद्धग्रस्त होर्मुझची सामुद्रधनी पार केली होती. ‘शिवालिक’ हे आज, सोमवारी गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल होईल, तर ‘नंदा देवी’ हे जहाज उद्या, मंगळवारी कांडला बंदरात पोहोचेल,’ अशी माहिती सरकारने दिली.  युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधनीच्या पश्चिमेकडे अडकलेल्या २४ पैकी ही दोन भारतीय जहाजे होती. शिवाय सामुद्रधनीच्या पूर्वेकडे भारताची आणखी चार मालवाहू जहाजे अडकली होती. त्यातील ‘जग प्रकाश’ या ओमानमधून निघालेल्या जहाजाने शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधनी पार केली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे