सातारा येथून दरोडा टाकून 21 तोळे सोने लंपास करणाऱ्या पाच जणांच्या शिरपूर पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या
सातारा/
सातारा जिल्ह्यातील सराफा कुरिअरवर दरोडा टाकून पांढऱ्या कारमधून पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. २२ तोळे लुटलेले सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.


