न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

यशवंतराव भोसले विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

“भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची ओळख आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे,” मराठी भाषेचा वैभवशाली इतिहास, संत-साहित्याची परंपरा, सामाजिक चळवळींतील मराठीचे योगदान आणि बदलत्या काळात भाषेचे जतन करण्याची गरज आज खरी गरज आहे, असे विचार यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे आयोजित ‘मराठी राजभाषा गौरव दिनात’ प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले.
“मराठी भाषेचे संवर्धन – काळाची गरज”. आधुनिक आणि डिजिटल युगात मराठीचे स्थान अधिक भक्कम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती कर्वेकर आणि प्रा. डॉ. रमाकांत गावडे (गोगटे–वाळके महाविद्यालय, बांदा), ‘कोकण लाईव्ह’चे संपादक श्री. सीताराम गावडे आणि प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप उपस्थित होते.
वक्त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणातून मराठी भाषेचा वैभवशाली इतिहास, संत-साहित्याची परंपरा, सामाजिक चळवळींतील मराठीचे योगदान आणि बदलत्या काळात भाषेचे जतन करण्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.
दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर, शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात मराठीतील लेखन-वाचन वाढविणे, तसेच पुढील पिढीपर्यंत मराठीचा समृद्ध वारसा पोहोचविण्याची जबाबदारी यावर भर देण्यात आला. डिजिटल माध्यमांमध्ये मराठीची उपस्थिती वाढविणे ही काळाची गरज असल्याचे संपादक श्री. सिताराम गावडे यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, आत्मभान आणि जाणीव निर्माण झाली. महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समितीच्या स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जतिन अ. टेकावडे
समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,विनोद रा. बिरादार समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,प्रा. डॉ. विजय अ. जगताप,प्राचार्य, यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, सावंतवाडी हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे