हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून वैश्य वाणी प्रिमिअर लीगचे आयोजन….. अध्यक्ष अमित गवंडळकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून दिनांक १४ व १५ मार्च रोजी वैश्य वाणी प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहर मर्यादीत ही क्रिकेट स्पर्धा असणार आहे, अशी माहिती युवा संघटनेचे अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी आज शनिवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्यावतीने या क्रिकेट लीगच आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये व द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये असणार आहे. वैश्य बांधवांनी आपल्या संघाच्या माध्यमातून यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. गवंडळकर यांनी केले. युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करत आहोत. नुकतेच कॅन्सर हॉस्पिटलला आमच्या संघटनेकडून मदत करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम देखील या संघटनेकडून राबविण्यात येणार असल्याचे शैलेश गवंडळकर यावेळी म्हणाले.
यावेळी संघटनेचे सल्लागार अरूण भिसे म्हणाले, वैश्य समाजातील युवक व महिलांना संघटित करण्याचा आमचा हेतू आहे. वैश्यवाणी प्रिमिअर लीग सावंतवाडीत व्हावी यासाठी आम्ही नियोजन केल आहे. कोलगाव, माजगाव, चराठा या गावातील समाजबांधव यात सहभागी असणार आहेत. या सर्वांची मिळून ही स्पर्धा होणार आहे. यानंतर तालुका व जिल्हा स्तरावर ही स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. शहरातून आम्ही याची सुरुवात करत असून ४ मार्च पर्यंत खेळाडूंनी नावे द्यायची आहेत अशी माहिती श्री. भिसे यांनी दिली.
यावेळी हिंदू वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, सल्लागार अरूण भिसे, प्रसाद नार्वेकर, बंड्या कोरगावकर, आबा केसरकर, श्रेयस मुंज, शैलेश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रशांत वाळके, जयेश स्वार, महेश बांदेकर, ऋतिक कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, सलील वंजारी, रूपेश कुडतरकर, महेश देऊलकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


