सांगलीत कोल्ह्याचा सात जणांवर हल्ला
सांगली/
सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी येथे कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.भर दिवसा कोल्ह्याने गावातल्या सात जणांवर हल्ला चढत जखमी केल्याच घटना घडली आहे. एका महिलेचा सात जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे,एका मागून एक अशा पद्धतीने या कोल्ह्याने ग्रामस्थांना लक्ष केलय जखमींना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे,या घटनेनंतर गावात भीतीच वातावरण पसरला असून ग्रामस्थांकडून कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र कोल्ह्याच्या या हल्ल्याच्या घटनेने गावात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.”


