न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सकल हिंदू समाजाकडून इचलकरंजीत निषेध मोर्चा

कोल्हापूर/

 कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्यानंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मागील आठवड्यात मोठा राडा पाहायला मिळाला होता. संतप्त नागरिकांनी महिलेच्या घरावर दगडफेक सुद्धा केली होती. यानंतर फलक फाडल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच महिलेच्या घरावर हल्ला करणाऱ्या एकूण 53 जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक सुद्धा करण्यात आली होती. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी इथं हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने हिंदू मुलांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनाने अत्यंत कडक कायदा काढावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी आज आमदार संग्राम जगताप आणि स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. इचलकरंजीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा असा या मोर्चाचा मार्ग होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या विटंबनेच्या घटनेमुळे कबनुर गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे