न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आईला मेसेज पाठविल्याच्या संशयाने युवकांकडून कोल्हापूरात हॉटेलची तोडफोड

कोल्हापूर/

कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीमध्ये ही घटना घडली. एका तरुणानं हॉटेलची तोडफोड केली. त्यानं त्या हॉटेलवर सुरुवातीला तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. संबंधित हॉटेलच्या मालकानं आईला अश्लील मेसेज पाठवले, असा आरोप या तरुणाने केला. त्या तरुणाच्या मनात प्रचंड राग दिसत होता. त्यानं सुरुवातीला हॉटेलवर तुफान दगडफेक केली, असे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या तरुणाचा पारा चढलेलाच होता. शेवटी पोलिसांनी त्याला ‘प्रसाद’ देण्यास सुरुवात केली. या घटनेमुळं परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. नेमकं काय झालंय, हे बघायला तिथं गर्दी जमली होती. या गर्दीमुळं बराच वेळ तिथं वाहतूक कोंडी झाली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे