न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 1.09 कोटी रू चा निधी मंजूर… नगराध्यक्षांकडून आमदार निलेश राणेंचे आभार

सिंधुदुर्ग/ साई सगम 

कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 1.09 कोटी रू चा निधी मंजूर झाला आहे आमदार निलेश राणे यांच्याकडे नगरपंचायतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.आमदार श्री राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून न.पं.तीला आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा सौ प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाणारे कुडाळ शहर हे रेल्वे स्थानक, व्यापारी बाजारपेठ , एमआयडिसी व विविध नागरी सुविधांमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर व्यापारी, उद्योजक, कामगार ,पर्यटक व ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा असते.त्यामुळे शहरातील घनकचऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.वाढत्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व दीर्घकालीन व्यवस्थापन करणे ही नगरपंचायतीसमोरची प्रमुख गरज होती.या पार्श्वभूमीवर आपण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करून आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून न.पं.तीला आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून या प्रकल्पासाठी 1.09 कोटी रू.निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रस्तावित प्रकल्पामध्ये बायोगॅस प्रकल्प – ओल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती,एमआरएफ शेड – सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर,सॅनिटरी लँडफिल – उर्वरित कचऱ्याची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट आदी घटकांचा समावेश असल्याचे सौ.बांदेकर यांनी म्हटले आहे.या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्याने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांना मोठी चालना मिळणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ.बांदेकर यांनी आमदार नीलेश राणे यांचे कुडाळ न.पं.तर्फे आभार मानले आहेत.कुडाळ शहराला प्रथमच घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत असून या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कुडाळ” या संकल्पनेच्या दिशेने एक ऐतिहासिक व निर्णायक पाऊल उचलले गेले आहे.सदर कामी सौ. बांदेकर यांनी प्रशासन व सर्व सहकारी न.प सदस्यांचे देखील आभार मानले व अशाच सकारात्मक ऊर्जेने प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे