न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबईत मुसळधार पाऊस… जनजीवन विस्कळित

मुंबई/ निलेश पाटील

मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. मुंबईकरांसाठी पुढचे काही तास खूप महत्वाचे असणार आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे