युवानेते विशाल परब हे येणाऱ्या काळातील सक्षम नेतृत्व, माजी नगराध्यक्ष साळगांवकर.
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कर्तृत्व, दातृत्व असणारे भाजपा युवा नेते विशाल परब हे येणाऱ्या काळातील सक्षम नेतृत्व बनतील, याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. असे गौरव उद्गार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. गेली अनेक वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप, टीशर्ट वाटप, शिधा वाटप, आपत्तीत सापडलेल्यांना मदत, वैद्यकीय मदत या माध्यमातून विशाल परब हे या मतदारसंघातून घराघरात पोहचले आहेत. अनेक स्तुत्य उपक्रम ते दरवर्षी घेत असतात. या भागातील शाळेंच्या अडचणी बाबत आम्ही सर्व नक्कीच विशाल परब यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. असे साळगावकर म्हणाले.
आज सोमवारी भाजपा युवानेते विशाल परब तसेच भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी साळगांवकर बोलत होते.
यावेळी कुणाल शुंगारे, मिसबा शेख, प्रसाद कशाळीकर, नवल साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, गुरू पेडणेकर आदी उपस्थित होते.


