सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने शनिवारी पाणी परीक्षण व अन्नपदार्थ परीक्षण
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा अंतर्गत पाणी परीक्षण व अन्नपदार्थ परीक्षण कार्यक्रम सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी संकुलन पत्रकार कक्षा शेजारच्या खोलीत शनिवारी दिनांक २९/०८/२६ व रविवार दिनांक ३०/०८/२६ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.कृपया ज्या व्यवसायिकांना सदर पाणी परीक्षण व अन्नपदार्थ परीक्षण करायचे आहे त्यांनी करून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी बॉटल व कंटेनर ज्यांना शक्य असेल त्यांनी भारतमाता हॉटेल येथून आदल्या दिवशी घेऊन जाणे.
सॅम्पल आणून देणाऱ्यांनी पाणी बॉटल पूर्ण भरून ( एक लिटर) आणावी. डब्यात ग्रेव्ही भरताना थंड करून भरावा. अन्नसुरक्षा परवाना झेरॉक्स प्रत आणावी. अन्नसुरक्षा परवान्याच्या मागे आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर लिहावा.G.S.T. नंबर असल्यास G.S.T. नंबर लिहावा, डब्यात काय पदार्थ आहे त्या पदार्थाचे नाव लिहावे. पाणी बॉटल असल्यास पाणी सॅम्पल लिहावे. अशा सूचना आयोजकांनी केल्या आहेत.


