न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संत गाडगेबाबा मंडईच्या पार्किंग जागेत भरणार बाजार: नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भरणारा बाजार रस्त्यावर न भरवता नव्याने बांधकाम होत असलेल्या संत गाडगेबाबा मंडईच्या पार्किंग जागेत बसवण्याचा निर्णय नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांनी घेतला आहे. बाजारपेठेत निर्माण होणारी वाहतूक कोंडी व गणेशभक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला असून आज गुरुवारी या जागेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला भरणारा बाजार रस्त्यावर न बसवता तो पार्किंगच्या जागेत बसविण्यात येईल. मोठ्या प्रमाणात व्यापारी येथे बसू शकतात. भाविकांना देखील इथे खरेदी करण्यासाठी सोयीस्कर ठरेल, पावसाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांना देखील ही जागा सुरक्षित असणार आहे असे नगराध्यक्षांनी सांगितले. दरम्यान, या मंडईच्या दोन्ही बाजूचा परिसर तात्काळ स्वच्छ करून घेण्यासह आवश्यक सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर यांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे