आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमी निमित्त जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्त श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोसकडून गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव विशेष सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये विभागून असून यामध्ये १५ वर्षांपर्यंत बालगट व १५ वर्षांच्या वरील खुला गट असे विभाग असतील. या अभंग गायन स्पर्धेसाठी दिनांक १२ मार्च पर्यंत स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी नाममात्र ₹१०१/- प्रवेश फी आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकानी तबला व हार्मोनियमच्या साथीने आपल्या आवाजातील तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठविणे आवश्यक आहे. बालगटासाठी २० व मोठ्या गटासाठी २० स्पर्धकांची अंतिम निवड केली जाईल.
बाल गटातील स्पर्धा गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी रात्र ठीक ८.०० वाजता सुरू करण्यात येईल तर मोठ्या गटातील स्पर्धा दिनांक २० मार्च रोजी रात्री ठीक ८.०० वाजता सुरू होईल. स्पर्धा संपन्न होताच मान्यवरांच्या हस्ते त्या त्या दिवशी बक्षीस वितरण केले जाईल. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षीसे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. लहान गटासाठी प्रथम क्रमांक ₹ ५०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ₹ ३०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ₹ २०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र त्याचबरोबर उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ₹१०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ₹.७५००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ₹.५०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ₹.३०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी ₹.१५००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.


