नांदेडात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची हत्या… तीन दिवसात पाच खून
नांदेड/
नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सोनू कल्याणकर (35) यांची मॉर्निंग वॉकदरम्यान तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. श्रीनगर परिसरात पहाटे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. मागील तीन दिवसांत पाच खून झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.


