पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे कुटुंबियांचे सांत्वन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार सिताराम गावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पत्रकार तथा सकल मराठा व सकल मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचा पुत्र समर्थ, वय १६ वर्षे याचे बुधवारी रात्री दहा वाजता दुःखद निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवार दिनांक १६ रोजी दुपारी सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवि मडगांवकर, गजानन गावडे, विद्याधर परब, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, अमित गवंडळकर, बंटी पुरोहित, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.


