माशेलचा सुप्रसिद्ध चिखलकाला उत्सव २४ते २६ जूलै पर्यंत पार पडणार… महेश काळे यांची अभंगवाणी विशेष आकर्षण
पणजी / प्रतिनिधी
गोव्यातील सांस्कृतीचे प्रतिक असलेल्या माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला उत्सवानिमित्त विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. २४ ते २६ जुलैला देवकीकृष्ण मंदिर परिसरात हा उत्सव रंगणार आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाची सुरुवात २४ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. प्रारंभी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ‘अनुभूती’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होईल.”
त्यानंतर महेश काळे यांचा ‘अभंगवाणी’ हा विशेष कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे. उत्सवादरम्यान पारंपरिक गोमंतकीय पाककलेचे सादरीकरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ‘मॉन्सून मॅजिक ऑफ गोवा’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


