न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे आठ गरजूंना प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम मध्ये आज आठ गरजू लाभार्थी व्यक्तींना सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी या विद्यार्थ्याला आणि सांताक्रूझ मुंबई येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यानीला शैक्षणिक आर्थिक सहाय्य करण्यात आले. मसुरे येथील ओमप्रसाद शेडगे या रक्ताच्या कर्करोगाने पिडित,ओटवणे येथील अक्षता जाधव या स्तनाच्या कर्करोगाने पिडित,पेंडूर येथील भाग्यश्री राऊत या आतड्यातील रक्तस्त्राव आणि ॲनिमिया आजाराने पिडीत,वर्दे येथील वासुदेव सावंत या पित्ताशयाच्या आजाराने पिडीत,पेंडूर येथील संजय गावडे या अपस्मार आणि मानसिक मतीमंदतेने पिडीत, विद्या ढवळे या किडनीच्या आजाराने पिडीत आणि नेमळे येथील रेश्मा झोरे या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या ग्रॅन्यूलोमा आजाराने पिडीत आहेत. या रूग्णांना ही आर्थिक मदत करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे