कार ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
अहिल्यानगर (अहमदनगर)/
अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या अपघातात श्रीरामपूर येथील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे. भीषण अपघातात श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला”


