न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तर्फे स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन करण्यात आले आहे. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव येथे शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. गंथ्रदिंडी, बाल साहित्य प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे.
कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त राज्यभरात ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सावंतवाडीत कोलगाव येथे या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेची समृद्धी आणि कुसुमाग्रजांचे योगदान याचा जागर केला जाणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८. ४५ वा. ग्रंथ दिंडीने या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. तसेच बाल साहित्य प्रदर्शन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी समीर घारे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षपदी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप जिल्हा सचिव ॲड.संतोष सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.‌ मराठी भाषेचा गौरव या कार्यक्रमात होणार असून चिमुकल्यांची सादरीकरण खास आकर्षण आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे