निर्माणाधीन पुलाचा एक भलामोठा भाग अंगावर पडून सहा जणांचा मृत्यू
कानपूर/
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. एका नदीवर सुरू असलेल्या निर्माणाधीन पुलाचा एक भलामोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. दुर्दैवी बाब म्हणजे, दिवसभर काम करून थकलेले मजूर याच पुलाच्या खाली झोपलेले होते. रात्री गाढ झोपेत असतानाच हा पूल अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मलब्याखाली आणखी काही मजूर अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासनाकडून मदतकार्य करण्यात येत आहे.”


